राम मंदिर लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला वार-पलटवार, देवेंद्र फडणवीस यांची कारसेवा अन् संजय राऊतांचं टीकास्त्र
प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही उत्साह संचारलेला आहे. तर दुसरीकडे राजकारणही तितकंच तापलंय. राममंदिरासाठी करण्यात आलेल्या कारसेवेवरून महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यात वार पलटवार
मुंबई, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत असताना महाराष्ट्राचं राजकारण मात्र शिगेला पोहोचलंय. कारसेवेला जातानाचा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला. यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. यावरूनच वार-पलटवार सुरू आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही उत्साह संचारलेला आहे. तर दुसरीकडे राजकारणही तितकंच तापलंय. राममंदिरासाठी करण्यात आलेल्या कारसेवेवरून महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यात वार पलटवार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर जुनी आठवण म्हणून एक फोटो शेअर केला आणि हा फोटो कारसेवा असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या फोटोनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बघा काय केली टीका?