राजकीय गांजाड्यांना लोक बेदम चोपल्याशिवाय राहणार नाहीत; राऊतांची नितेश राणे आणि लाड यांच्यावर टीका
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली.
गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.
Latest Videos