Sanjay Raut : मोक्याच्या क्षणी अजित पवार यांना मच्छर चावला अन् डेंग्यू झाला, संजय राऊत यांचा खोचक टोला
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून परिस्थिती हिंसक होत चालली आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी केली तर काही ठिकाणी जाळपोळ केली आहे. यामुळे राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. अशातत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय,
नवीदिल्ली, ३० ऑक्टोबर २०२३ | छत्तीसगडमधील प्रचार महत्त्वाचा आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह राज्यातील जनमाणस महत्त्वाचा आहे? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. आता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, असे म्हणत खोचक टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा आवाकाच नाही. तर दोन उपमुख्यमंत्र्यांनी यातून काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणामध्ये हे राज्य सापडलं आहे, असा घणाघात करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आहे.