Sanjay Raut Live | खेड तालुक्यात शिवसेनेचा भाजपला दणका, भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना नेते संजय राऊत आज खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितत आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाषण करताना संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली.
शिवसेना नेते संजय राऊत आज खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितत आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाषण करताना संजय राऊतांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. पक्षात थोटी शिस्त आणली की दिलीप मोहीते घरी बसतील. आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलं आहे, अशा शब्तात राऊत यांनी पुन्हा एकदा खेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.
Latest Videos