गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’साठी मुंबईत रोड शो चालतो का?

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’साठी मुंबईत रोड शो चालतो का?

| Updated on: Dec 02, 2021 | 11:26 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली होती. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला होता.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली होती. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ते रोड शो करत आहेत. भाजपला हे चालतं का? असा सवाल संजय राऊत यांनी शेलार यांना केला आहे.