ते मूर्ख असतील पण मी…, संजय राऊत यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं
गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच शाब्दिक वार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर नागपूरहून अयोध्येच्या दिशेने कारसेवेला जातानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांना चांगलंच फटकारलं होतं.
नाशिक, २२ जानेवारी २०२४ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच शाब्दिक वार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर नागपूरहून अयोध्येच्या दिशेने कारसेवेला जातानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांना चांगलंच फटकारलं होतं. राऊतांनी या फोटोवर भाष्य करताना म्हटले आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल…संजय राऊत यांच्या खोचक टीकेवर देवेंद्र फडणवीसांना सवाल केला असता ते म्हणाले, मी मुर्ख लोकांना उत्तर देत नाही. याच टीकेवरून संजय राऊत यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘शतमूर्ख’ असा केला. देवेंद्र फडणवीस यांना मी मूर्ख म्हणणार नाही जरी. ते शतमूर्ख असतील तरी तसं मी म्हणणार नाही, त्यांनी कारसेवकांचा अपमान केलाय, असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय.