Sanjay Raut : काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
Sanjay Raut On Shivsena Shinde Group : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आज निशाणा साधत टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी हा निशाणा साधला.
दोन भाऊ एकत्र आल्यास कायमचं शेतावर जाऊ, अशी एकनाथ शिंदे यांना भीती आहे. त्यामुळे काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. 2 भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेवर शिंदेंच्या शिवसेनेची गाळण उडाली, असाही निशाणा राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर साधला.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल अशी त्यांना भीती आहे. महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. म्हणून त्यांना भीती वाटत असेल आणि त्यामुळेच त्यांच्या पोटातून काही मळमळ बाहेर पडत असेल. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. या सगळ्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने बघतो, असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.