महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIMचा विरोध का? शिवसेना खासदार संजय राऊतांचा सवाल
सध्या शिवसेना आणि एम आय मध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याऐवजी सैनिकी शाळा उभी करा असे आवाहन एमआयएमनं केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमला थेट इशारा दिला आहे. एमआयएमचा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध नेमका का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबाद शहरातल्या कॅनॉट गार्डन परिसरामध्ये बसविण्यात येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून सध्या शिवसेना आणि MIMमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याऐवजी सैनिकी शाळा उभी करा असे आवाहन एमआयएमनं केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र इम्तियाज जलील यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. या वादामुळे औरंगाबादेत आता शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 23, 2022 05:00 PM
Latest Videos