Sanjay Raut | लखीमपुरमध्ये घडलेली घटना अत्यंत निर्घृण : संजय राऊत
महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली
लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला आहे. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. त्यांनी महाराष्ट्र बंदमध्य सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठींबा देणे आहे, असे म्हणत भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला. ते मुंबईत ट्विव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Latest Videos