'मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाहीत तर...', फडणवीस यांच्या 'त्या' कृतीवरून संजय राऊत यांचा निशाणा

‘मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाहीत तर…’, फडणवीस यांच्या ‘त्या’ कृतीवरून संजय राऊत यांचा निशाणा

| Updated on: Mar 10, 2024 | 1:07 PM

आज पुणे शहरात विविध कार्यक्रमांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. लोकार्पण आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असताना मंचावर एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला.

मुंबई, १० मार्च २०२४ : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुण्यातच आहेत. आज पुणे शहरात विविध कार्यक्रमांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे. लोकार्पण आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. दरम्यान, आज सकाळी पुण्यातील पहिल्या कार्यक्रमात बारामती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असताना मंचावर एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला. मंचावर उपस्थित असताना देवेंद्र फडणवीस यांना दोनदा कुणाचा तरी फोन आला आणि सुप्रिया सुळे बाजूला असताना त्यांच्यापासून दूर मंचावरील एका कोपऱ्यात जाऊन फडणवीसांनी फोनवर संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. ‘मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाहीत, खुलेआम बोलतात..’, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी फडणवीसांच्या त्या कृतीवर भाष्य केले आहे.

Published on: Mar 10, 2024 01:07 PM