हिंम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊत यांचा हल्लाबोल

“हिंम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 07, 2023 | 12:51 PM

"गेल्या आठवड्यात नांदेड आणि बीडला मेळावे घेतले. मराठवाड्यातील वातावरण मविआला पोषक आहे. संभाजीनगरचा गड आम्ही परत आणणार आहोत.शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मजबूती आमच्या मागे उभी आहे. उद्या कधीही निवडणुका झाल्या तरी आम्ही जागा खेचून आणू", असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले

औरंगाबाद : “गेल्या आठवड्यात नांदेड आणि बीडला मेळावे घेतले. मराठवाड्यातील वातावरण मविआला पोषक आहे. संभाजीनगरचा गड आम्ही परत आणणार आहोत.शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मजबूती आमच्या मागे उभी आहे. उद्या कधीही निवडणुका झाल्या तरी आम्ही जागा खेचून आणू”, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी निवडणुकांवरून पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “आमच्याकडून मागच्यावेळी औरंगाबादचा गड निसटला असला तरी आम्ही तो परत आणू. शिवसेनेचे आमदार पळून गेले. बेईमानी केली. तरीही शिवसैनिक आमच्या मागे आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर या सर्व जागा आम्ही खेचून आणू अशी जिद्द शिवसैनिकांनी केली आहे. अर्थात निवडणुका घेण्याची हिंमत या सरकारने दाखवायला हवी. हे सरकार निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. मग तुम्हाला कोणत्या जनमताचा पाठिंबा आहे? तुमचं सरकार कायदेशीर आहे. गतिमान आहे. मग निवडणुका होऊन जाऊ द्या ना? जनता कुणाच्या पाठी हेही दिसेल. खरं कोण खोटं कोण होऊन जाऊ द्या”, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Published on: Jun 07, 2023 12:28 PM