Sanjay Raut : शाळेत मराठी सक्तीची नसावी यासाठी सोमय्या कोर्टात गेले होते, संजय राऊतांची माहिती
भाजपचे नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे, असं शिवसेना नेते राऊत म्हणालेत. तर शाळेत मराठी सक्तीची नसावी यासाठी सोमय्या कोर्टात गेले होते, असंही राऊत यावेळी म्हणालेत.
मुंबई: भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला (Mumbai) केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे. त्यांच नेतृत्व किरीट सोमय्या (kirit somaiya) करत आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं. सर्व चोर आणि लफंगे आहेत. त्यांचं नेतृत्व सोमय्यांकडे आहे. काहीही करून त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी सोमय्या हा लफंगा, चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीत जात असतो.असं राऊत म्हणालेत. तर शाळेत मराठी सक्तीची नसावी, यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या कोर्टात गेले होते, असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलंय.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
