Sanjay Raut : उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं मोठं विधान
खासदार संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर पत्रकारांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलेलं आहे. काही लोकांना दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असं वाटतं, असं सूचक विधान देखील यावेळी बोलताना राऊत यांनी केलं आहे. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊत यांनी भाष्य केलं.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसासाठी पुढचं प्रत्येक पाऊल आपण टाकलं पाहिजे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. हीच भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली आहे. त्यात आता जर मनसे प्रमुखांनी काही भूमिका मंडळी आहे तर त्यात वाद घालावा असं काही नाही. असे वाद महाराष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवलेली नाही, असं राऊत यांनी स्पष्ट म्हंटलं.

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं

दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे

पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर

पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
