'... गुन्हा आहे का?', लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर संजय राऊतांकडून ओवैसी यांची पाठराखण

‘… गुन्हा आहे का?’, लोकसभेतील ‘त्या’ घोषणेनंतर संजय राऊतांकडून ओवैसी यांची पाठराखण

| Updated on: Jun 26, 2024 | 1:16 PM

असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी शपथविधी दरम्यान लोकसभेत जय पॅलेस्टाईन…अशी घोषणा दिली होती. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यावरूनच शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांनी असदुद्दीन ओवैसी यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी शपथविधी दरम्यान लोकसभेत जय पॅलेस्टाईन…अशी घोषणा दिली होती. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यावरूनच शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांनी असदुद्दीन ओवैसी यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. ‘पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?’, असा सवाल सजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना ओवैसींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. अर्थात ही घोषणा लोकसभेच्या पटलावरुन काढून टाकण्यात आली आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे.

Published on: Jun 26, 2024 01:16 PM