Sanjay Raut | मुंबई विमानतळाचा मालकी हक्क कोणाकडे नाही, असं होत असेल तर शिवसेना सहन करणार नाही
अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड उखडून फेकला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं.
अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड उखडून फेकला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.
Latest Videos