कल्याण लोकसभा मतदारसंघ ही कोणाची जहागिरी नाही- संजय राऊत

कल्याण लोकसभा मतदारसंघ ही कोणाची जहागिरी नाही- संजय राऊत

| Updated on: Jan 13, 2024 | 2:45 PM

कल्याण :13 जानेवारी 2024 | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील देसाई गावात शाखेचं उद्धाटन केलं. तिथल्या नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं स्वागत केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. “जे आज आमच्या स्वागताला निष्ठेने उभे आहेत तेच खरे शिवसैनिक आहेत. याच जोरावर आपल्याला […]

कल्याण :13 जानेवारी 2024 | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील देसाई गावात शाखेचं उद्धाटन केलं. तिथल्या नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं स्वागत केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. “जे आज आमच्या स्वागताला निष्ठेने उभे आहेत तेच खरे शिवसैनिक आहेत. याच जोरावर आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना अजून पुढे घेऊन जायची आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ ही कोणाची जहागिरी नाही. तर ही शिवसेनेची ताकद आहे. ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 55-60 वर्षांपूर्वी केली, त्यावेळी जे गोधडीत सुद्धा नव्हते तेही आज म्हणतायत आमची शिवसेना आणि न्यायासनावर बसलेली व्यक्तीसुद्धा म्हणतेय की त्यांचीचं शिवसेना,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

“जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आपण दाखवून देऊ की ‘फक्त शुद्ध भगवा जिथे फडकत असेल तिच खरी शिवसेना’ बाकी डुप्लिकेट माल इथे चालणार नाही. तसंच शिवसैनिकांमध्ये असलेला जोश, निष्ठा ही भाड्याने मिळत नाही. ती खरी असली पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.

Published on: Jan 13, 2024 02:45 PM