Sanjay Raut : त्यांची युती होईल तेव्हा त्यावर बोलू; राऊतांचा शिंदे – ठाकरेंच्या भेटीवर टोला
Sanjay Raut On Shinde - Thackeray Meeting : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली. त्यावर एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथअसतं शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युतीसाठी त्यांच्यात ही भेट झाली असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत. याच संदर्भात आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यावरून राऊत यांनी टीका करत एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी आमरस पुरी खाण्यासाठी गेले होते, असं म्हणत राऊतांनी शिंदे – ठाकरेंच्या भेटीवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी आमरस पुरी खाण्यासाठी गेले होते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर देखील त्यांनी निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांमध्ये युती होईल का? याबद्दल राऊतांना प्रश्न विचारला असता यावर त्यांच्यात युती झाल्यानंतर आपण बोलू, असं त्यांनी म्हंटलं. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली, हे मला कोणीतरी कानात सांगतं,असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष

आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल

देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
