देवेंद्र फडणवीस खरंच गृहमंत्री आहात का?विचारा जरा स्वत:ला, संजय राऊत यांचा घणाघात

“देवेंद्र फडणवीस खरंच गृहमंत्री आहात का?विचारा जरा स्वत:ला”, संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Jun 08, 2023 | 12:14 PM

ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे आणि काही पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या धमक्यांवरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "महाराष्ट्रात अशा धमक्या ऑन एअर कोणी दिल्या नव्हत्या. फडणवीस म्हणतात ना औरंग्यांना सोडणार नाही. ते औरंगे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत.

औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे आणि काही पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या धमक्यांवरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रात अशा धमक्या ऑन एअर कोणी दिल्या नव्हत्या. फडणवीस म्हणतात ना औरंग्यांना सोडणार नाही. ते औरंगे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत. मोगलाई दुसरी काय होती हीच ना. मोगलाई म्हणजे खान, सलीम नाही. तर मोगलाई म्हणजे प्रवृत्ती आहे. हिंमत असेल तर करा या लोकांवर कारवाई. ज्यांनी ऑन एअर धमक्या दिल्या त्यांच्यावर कारवाई करण्याची गृहमंत्र्यांमध्ये हिंमत आहे काय? पोलीस आयुक्तांना फोन करून धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची तुमच्यात हिंमत आहे काय? तरच फडणवीस यांनी सांगावं या राज्याचा मी गृहमंत्री आहे म्हणून.विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी मग चौकशी. देशभरात आणि राज्यात हाच प्रकार सुरू आहे. स्वत: बाबतीत चौकशी नाही, एफआयआर नाही, तक्रार नाही, गुंडापुंडाचं खुलं समर्थन ही या राज्याची परिस्थिती आहे. म्हणून फडणवीस यांनी स्वत:ला विचारावं मी या राज्याचा गृहमंत्री आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Published on: Jun 08, 2023 12:14 PM