SIT नेमून काय करणार? आमची उखडणार? संजय राऊत यांची भाषा घसरली अन् सरकारवर केला घणाघात
राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण केले जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलंय तर यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारबद्दल भविष्यवाणी करत 2024 नंतर देशातील सरकार बदलणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : एसआयटी चौकशीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण केले जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलंय तर यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारबद्दल भविष्यवाणी करत 2024 नंतर देशातील सरकार बदलणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, तुम्हाला एखाद्या विषयात एसआयटी स्थापन करायचीये तुम्ही करा, दिशा सालियान प्रकरणाचा तपास कुणाकडे द्यायचा त्यांच्याकडे द्या, पण या देशातील या राज्यात कायदा व सुवस्थेची धुळदाण उडाली आहे, त्याविषयी तुम्ही बोलू नका. कुणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. लोकशाही मधील ही तात्पुरती व्यवस्था आहे. तुम्ही काय उखडणार आमची? असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाण साधला आहे.
Published on: Dec 12, 2023 01:02 PM
Latest Videos