Sanjay Raut | अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत - संजय राऊत

Sanjay Raut | अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत – संजय राऊत

| Updated on: Sep 26, 2021 | 5:01 PM

पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे राऊत यांचं राष्ट्रवादीला हे थेट आव्हानच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत आज पिंपरी चिंचवडला आहेत. पुणे जिल्ह्यात आपले कोण आयकत नाही असं काही सांगतात. असं कसं? मुख्यमंत्री आपले आहेत. अजित पवारही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना सांगू आमचेही ऐका. नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? असं राऊत यांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर राऊत यांनी लगेच सारवासारव करण्यास सुरुवात केली. बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली.