ED लागल्याने Sanjay Raut यांना पैशाचा हिशोब ठेवावा लागतो- Ashish Shelar यांचा टोला

ED लागल्याने Sanjay Raut यांना पैशाचा हिशोब ठेवावा लागतो- Ashish Shelar यांचा टोला

| Updated on: Apr 05, 2022 | 12:22 PM

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (kolhapur north bypoll) मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं होतं.

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (kolhapur north bypoll) मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भोंगे लावण्याचं चंद्रकांत पाटलांना कळलं. भाजप आपल्या खर्चानं करताहेत. आता तिथेही ईडी लावतील. जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेला तरी, तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं? किती घेतलं? आज किती घेतलं? यावर भाजपचं लक्ष आहे. ते ईडीला कळवतील. त्यामुळे सावध राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.