बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊत यांचं ट्विट, सलीम जावेद दोन्हो जेलमे जाएंगे, मोहित कंबोज यांचं प्रत्युत्तर
आज संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं आहे. तर, मोहित कंबोज यांनी सलीम जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर केला आहे.
शिवेसना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, निल सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांच्या ईओडबल्यूनं आणि आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागानं निकॉन इन्फ्रावर कारवाई करण्याबाबत विचारा करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. आज संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं आहे. तर, मोहित कंबोज यांनी सलीम जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर केला आहे.

मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट

बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...

पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्

बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
