'एकला चलो रे'... विधानसभेनंतर आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?

‘एकला चलो रे’… विधानसभेनंतर आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?

| Updated on: Dec 14, 2024 | 10:27 AM

काँग्रेसने पालिका निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. तर संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राऊतांवरच निशाणा साधला आहे. '

विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाते नेते संजय राऊत यांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे नारे दिलेत. यानंतर काँग्रेसने देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. तर संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राऊतांवरच निशाणा साधला आहे. ‘संजय राऊतांच्या देहबोलीत, वागण्यातून वैफल्य आल्याचे दिसतेय. त्यामुळे त्यांनी नैराश्येपोटी एकला चलो चा नारा दिलाय.स्वबळावर लढण्याचा त्यांनी नारा दिला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.’, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर पालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. दरम्यान, आगामी पालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी पैसे खाण्यासाठी शेवटची संधी असल्याचे म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर काँग्रेसनेही पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला तर दुसरीकडे महायुती म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.  बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Dec 14, 2024 10:27 AM