सांगलीच्या जागेवरून उभी फूट पडणार? संजय राऊतांची काँग्रेसला थेट धमकी, नौटंकी बंद करा

सांगलीच्या जागेवरून उभी फूट पडणार? संजय राऊतांची काँग्रेसला थेट धमकी, नौटंकी बंद करा

| Updated on: Apr 07, 2024 | 11:22 AM

सांगली दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनाच घरी बसवण्याचा इशारा दिला. सांगलीच्या जागेचा वाद टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत जाऊन संजय राऊतांनी काँग्रेसला एकाच वेळी दोन इशारेच दिले नाहीतर थेट धमकी दिली

सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उभी फूट पडताना दिसतेय. सांगली दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनाच घरी बसवण्याचा इशारा दिला. सांगलीच्या जागेचा वाद टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत जाऊन संजय राऊतांनी काँग्रेसला एकाच वेळी दोन इशारेच दिले नाहीतर थेट धमकी दिली. सांगलीचा उमेदवार बदलणार नाही…जर आमची कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा दम राऊतांनी काँग्रेसला दिला. राऊतांनी काँग्रेसलाच दम दिला नाहीतर राष्ट्रवादीने नौटंकी बंद करावी, असा इशाराही दिला. काँग्रेसचा दावा असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस अजूनही ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ठाम आहे. त्यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. दरम्यान सांगलीच्या जागेवरून सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू आहे. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर आलेत. यावरून संजय राऊतांना डिवचण्यात आलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 07, 2024 11:22 AM