Sanjay Raut : शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुसरे दुर्दैव काय, संजय राऊतांची प्रतिक्रिया
'ही वेळ केवळ बंडखोरांमुळे आली असून महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हे सर्व उघड्या डोळ्यानं पाहत आहे. एकनाथ शिंदे गटाचा वापर करुन शिवसेना फोडण्याचे काम हे भाजप करीत आहे.'
मुंबई : शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखे दुसरे दुर्देव काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेत आधीच आमदार त्यानंतर खासदार आणि आता पदाधिकारी हे (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी होत असताना या गटाने थेट (Shivsena) शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरु असून दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राऊत यांनी याच मुद्द्याला धरून टीकास्त्र सोडलंय. ‘ही वेळ केवळ बंडखोरांमुळे आली असून महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हे सर्व उघड्या डोळ्यानं पाहत आहे. या गटाचा वापर करुन शिवसेना फोडण्याचे काम हे भाजप करीत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. मात्र, ज्या पक्षामुळे सर्वकाही मिळाले त्याच पक्षातील बंडखोरांमुळे ही वेळ आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.