Jalgaon | खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एंट्री, जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेणार

Jalgaon | खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एंट्री, जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेणार

| Updated on: Jun 12, 2021 | 1:58 PM

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 12, 2021 01:58 PM