“व्यासपीठावर जावं की नाही, हा शरद पवार यांचा व्यक्तिगत प्रश्न, मात्र…”, संजय राऊत यांची टीका

| Updated on: Aug 01, 2023 | 11:22 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला जावे की, जावू नये, हा खरा वाद आहे. वाद हा मोदींवर नव्हे तर शरद पवारांवर आहे. हा वाद मोदींनीच निर्माण केला आहे. व्यासपीठावर जाण्याचा निर्णय हा शरद पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे. व्यासपीठावर जावे की नाही हा पवारांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, लोकभावना त्यांनी जावू नये.”

Published on: Aug 01, 2023 11:22 AM
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर राऊत यांची खोचक टीका; ‘त्यांनी मणिपूरमध्ये जावं…’
“समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत”, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा