Nawab Malik यांचा राजीनामा घेऊ नका , Sanjay Raut यांची मागणी - tv9

Nawab Malik यांचा राजीनामा घेऊ नका , Sanjay Raut यांची मागणी – tv9

| Updated on: Feb 23, 2022 | 8:19 PM

आता एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत कसे गप्प बसतील. उशीरा का होईना पण संजय राऊत गरजलेच. संजय राऊतांनीही ट्विट करत भाजपला थेट अफजलखानाची उपमा दिली आहे. तर हिंदूत्व काय आहे. हेही सांगितलं आहे.

मुंबई : राज्यात आज सकाळचा दिवस उजाडल्यापासूनच खळबळ माजलीय. सकाळी चौकशी सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत तर नवाब मलिक यांना अटक झाली. त्यानंतर दोन्ही बाजुंच्या नेत्यांचे ट्विटवर ट्विट यायला लागले. आता एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत कसे गप्प बसतील. उशीरा का होईना पण संजय राऊत गरजलेच. संजय राऊतांनीही ट्विट करत भाजपला थेट अफजलखानाची उपमा दिली आहे. तर हिंदूत्व काय आहे. हेही सांगितलं आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका असा सल्लाही राऊतांनी दिलाय. आता राऊतांचा हा सल्ला पवार किती ऐकताहेत हेही पाहणं तेवढेच महत्वाचे आहे. पण सध्या राजकीय हलचालींना वेग आलाय.