Special Report | संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज!-TV9

Special Report | संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज!-TV9

| Updated on: Jan 12, 2022 | 8:55 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई : गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला

गोव्यात भाजपला गळती लागली असून अनेक आमदार, नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. असे असले तरी दुसरीकडे गोवा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेवर भाजपकडून टीका केली जातेय. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत असते. अनामत रक्कम जप्त न होण्यासाठी त्यांची लढाई असते, अशी खोचक टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राऊत यांनी समर्पक उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असे राऊत म्हणाले.

Published on: Jan 12, 2022 08:55 PM