पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

| Updated on: Oct 17, 2021 | 1:26 PM

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते. (Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar)