Pravin Darekar | 370 हटवण्यावरचं संजय राऊत यांचं वक्तव्य दुटप्पी : प्रवीण दरेकर
370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे?
यावेळी त्यांनी 370 कलमावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे? 370 कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मूकश्मीरची काळजी करू नका. अमित शहा सक्षम आहेत. चिनी आक्रमण असेल किंवा कश्मीरची सुरक्षा असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल… टोकाची धमक असल्यांच त्यांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात अराजकता आहे. महिला असूरक्षित आहेत. राज्य सरकारला सल्ला देऊन काही कारवाई झाली तर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असा चिमटाही त्यांनी काढला.
Latest Videos