AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...तर राजभवनाची राहीलेली ईज्जत पण जाईल, Sanjay Ruat यांचा राजभवनाला इशारा

…तर राजभवनाची राहीलेली ईज्जत पण जाईल, Sanjay Ruat यांचा राजभवनाला इशारा

| Updated on: Apr 11, 2022 | 12:42 PM

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल, असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे. सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेरही या घोटाळ्याचं लोण आहे. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्या हे दोन्ही लफंगे बापबेटे लपून बसले आहेत. अंतरीम जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने सेटिंग करत आहेत. मात्र, त्यांना जामीन मिळणार नाही, असा दावादेखील संजय राऊत यांनी केला आहे.