शिंदेंची शिवसेना ही पाकिटमार, राऊतांच्या टीकेवर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले 'ते' 10 लाख परत करा...

शिंदेंची शिवसेना ही पाकिटमार, राऊतांच्या टीकेवर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले ‘ते’ 10 लाख परत करा…

| Updated on: Jan 17, 2024 | 6:23 PM

संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेना ही पाकिटमार असल्याचा हल्लाबोल केलाय. तर मिंधे गटाला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याची टीकाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरील संजय राऊत यांच्या टीकेवर संजय शिरसाट काय म्हणाले?

मुंबई, १७ जानेवारी २०२४ : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. दरम्यान, नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे जाहीर केले. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यानंतर संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेना ही पाकिटमार असल्याचा हल्लाबोल केलाय. तर मिंधे गटाला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याची टीकाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरील संजय राऊत यांच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी पटलवार केला आहे. ‘एकनाथ शिंदे यांचे १० लाख रूपये घेतलेले जे ईडीच्या रेडमध्ये सापडले ती पाकिटमारी तुम्ही विसरले. ते १० लाख परत करा’, असा घणाघातही शिरसाट यांनी केला.

Published on: Jan 17, 2024 06:22 PM