“ठाकरे गटातील अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यास उत्सुक”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
औरंगाबाद, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “दिघेंचा मृत्यू घातपात झाला आहे. हे सर्वांना माहीत आहे, ठाणेकरांना माहिती आहे.जे दिघे साहेबांचे नाव घेतात, त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांचा कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता ? त्यांना माहीत होत अंत्ययात्रेला गेल तर लोक दगड मारतील म्हणून ते गेले नाही.”
Published on: Jul 30, 2023 11:54 AM
Latest Videos