ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 29, 2024 | 5:01 PM

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा शरद पवार यांच्या कुटनीतीचा भाग होता, यासह आम्ही तुमच्या सोबत येतो, असा प्रस्ताव शरद पवारांनी अमित शाह यांना दिला होता, असा दावाही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं, असं वक्तव्य करत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा शरद पवार यांच्या कुटनीतीचा भाग होता, यासह आम्ही तुमच्या सोबत येतो, असा प्रस्ताव शरद पवारांनी अमित शाह यांना दिला होता, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लावणे हा राजकारणाचा एक भाग होता. उद्धव ठाकरे यांना भावनिक करून राजीनामा द्यायला लावण्याचा आणि नंतर भाजपसोबत जाण्याचा शरद पवार यांचा डाव होता. सर्व राजकारण शरद पवार यांनी केलं. त्यांना संजय राऊत यांचा पाठिंबा होता. तर संजय राऊत हा कुणाचा माणूस विचारले तर ते शरद पवार यांचा माणूस आहे असं म्हणणार’, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

Published on: Apr 29, 2024 05:01 PM