ज्याला स्वीकारलंच नाही तो अडचणीचा कसा?; नवाब मलिक यांच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची रोखठोक भूमिका
नवाब मलिक सत्तेमध्ये आमच्यासोबत बसू शकणार नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर नवाब मलिक महायुतीसाठी अडचणीचे ठरताय का? असा सवाल शिरसाट यांना केला असता ते म्हणाले, आम्हाला काही अडचणीचे मलिक नाही. कारण...
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : सभागृहात नवाब मलिक यांनी कुठं बसावं याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेतील. नवाब मलिक हे सत्तेत आहेत किंवा नाही, याचा निर्णय किंवा यासंदर्भातील पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यापैकी कुणालाही दिलेले नाही. त्यामुळे नवाब मलिक यांची जागा ठरवण्याचा अधिकार हा सभागृहात विधानसभा अध्यक्षांचा आहे, याचा निर्णय होईल, असे संजय शिरसाट म्हणाले तर नवाब मलिक सत्तेमध्ये आमच्यासोबत बसू शकणार नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर नवाब मलिक महायुतीसाठी अडचणीचे ठरताय का? असा सवाल शिरसाट यांना केला असता ते म्हणाले, आम्हाला काही अडचणीचे मलिक नाही. कारण आम्ही त्यांना स्वीकारले नाही. ज्यांनी त्यांना स्वीकारलं असेल त्यांना मलिक अडचणीचे आहेत असे म्हणत संजय शिरसाट यांनी मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, असे स्पष्टपणे म्हटले.