आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न…, शरद पवारांच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य
शरद पवार यांच्या मुलाखतीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये पहिल्यांदा विलीनीकरण होणार नाहीये. शरद पवार यांना माहिती आहे आता आपण थकलोय... बघा काय म्हणाले शिरसाट?
भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला. शरद पवार यांच्या मुलाखतीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये पहिल्यांदा विलीनीकरण होणार नाहीये. शरद पवार यांना माहिती आहे आता आपण थकलो आहोत आणि आपण काँग्रेसमध्ये गेलो तर आपल्या मुलीचं सुप्रिया सुळे यांचं पुनर्वसन होईल, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. तर दुसरीकडे उबाठा गटाचे नेते आज काँग्रेसमय झाले आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष विलीन करायचा की नाही? त्यांच्यासोबत राहायचं की नाही? हाच प्रश्न त्याच्यासमोर आहे. इतकंच नाहीतर काँग्रेसमध्ये जाणंच योग्य आहे, असा इशारा शरद पवारांनी लहान पक्षांसह उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.