ललित पाटील प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, ड्रग्स बनवण्याचा फॉर्म्युला देणारा कोण?

ललित पाटील प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, ड्रग्स बनवण्याचा फॉर्म्युला देणारा कोण?

| Updated on: Oct 23, 2023 | 11:01 AM

tv9 Marathi special report | ललित पाटील प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू, ललित पाटील प्रकरणात नाशिक आणि मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना फडणवीस यांच्या दाव्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय तर संजय शिरसाट यांनी देखील यावर पटलवार केल्याचे पाहायला मिळाले

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | ललित पाटील प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरु आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याला राऊतांनी उत्तर दिलं आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी पटलवार केला आहे. ललित पाटील प्रकरणात एकीकडे नाशिक आणि मुंबई पोलिस कसून तपास करतायत. तर दुसरीकडे राजकारणही तितक्याच जोरात सुरु आहे. ड्रग्स प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ललित पाटीलला 2020 मध्ये अटक झाली तेव्हा तो ठाकरेंचा नाशिक शहरप्रमुख होता असा दावा फडणवीसांनी केला आहे. तर हा दावा खोडून काढताना संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. तर शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ललित पाटील शहरप्रमुखच होता. तेव्हा ललितकडून यांनी मलिदा खाल्ल्याचा घणाघात शिरसाट यांनी ठाकरेंवर केला आहे. बघा याप्रकरणावरील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 23, 2023 11:01 AM