Sanjay Shirsat : ‘जमल्यास त्यांचंही दूध काढू’, पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा राऊतांच्या ‘त्या’ जहरी टीकेवर पटलवार
कुणाल कामरा याच्यावर हक्कभंग आणत असतानाच त्याचे युट्यूब चॅनलही तपासण्याची मागणी करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर राऊतांनी भाष्य केलं. शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केलेल्या खोचक टीकेनंतर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्याकडून जशासतसे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा असा केला. तर पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही, जमल्यास यांचंही दूध काढू, असं म्हणत शिरसाटांनी पलटवार केलाय. दरम्यान, शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात. शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही. ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध काढू शकतात, अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊत यांनी केली होती. या देशात कायदा आहे आणि काही प्रमाणात आमच्या सारख्या लोकांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवले आहे, असे म्हणत असताना हा देश खूप मोठा आहे. पण शिंदे गटाला त्यांचा देश अमित शहा यांच्या पलिकडे दिसत नाही, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. जोपर्यंत अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची अशी भाषा चालेल. पण रामकृष्ण ही आले गेले, तसे मोदी-शहा पण जातील-येतील इतके लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊतांनी दिला.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा

'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
