‘मविआची पहिली संयुक्त सभा, पण सभेच्या बॅनरवर…’, शिवसेना नेत्यानं ठाकरे गटाला काय फटकारलं?
VIDEO | 'संभाजीनगरमध्ये सभा घेताय, ठाकरे गटाला लाज वाटली पाहिजे', ठाकरे गटाचा कुणी घेतला समाचार?
संभाजीनगर : महाविकास आघाडीची संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत असतानाच विरोधकांना एकीचे बळ दाखवण्यासाठी ही वज्रमूठ असल्याचेही मविआच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत असल्याने सत्ताधाऱ्यांसह राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या सभेची बॅनरबाजी संभाजीनगरसह राज्यात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या बॅनरवरूनच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलंच फटकारल्याचे दिसतेय. महाविकास आघाडीची ही संयुक्त सभा होत असताना आणि एवढी मोठी गर्दी होत असली तरी सभेच्या बॅनरवरून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटा का लावण्यात आला नाही असा सवालही त्यांनी केला आहे. हे आज जोरदारपणे सभा घेत असले तरी ठाकरे गटाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे.