‘भुमिका चांगली, परंतु दुटप्पी’; उत्तर भारतीयांच्या मेळाव्यावरून शिवसेना नेत्याची ठाकरे यांच्यावर आगपाखड
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली कंबर कसली आहे. ते आता मैदानात उतरले असून सभा आणि मेळावे घेणार आहेत. याच दरम्यान ठाकरे ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच घुसणार आहे. ठाकरे येथे उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहेत.
औरंगाबाद, 29 जुलै 2023 | राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर त्याचपार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली कंबर कसली आहे. ते आता मैदानात उतरले असून सभा आणि मेळावे घेणार आहेत. याच दरम्यान ठाकरे ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच घुसणार आहे. ठाकरे येथे उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहेत. तो मेळावा आज असून काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. यावरून शिंदे गटाचे नेते शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर ठाण्यात उत्तर भारतीयांची ठाकरे सभा घेत आहेत. पण याच्या आधी त्यांनी अनेकवेळा उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता मात्र ते मतांच्या बेरजेसाठी उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत. ही भूमिका चांगली आहे परंतु दुटप्पी असल्याचा घणाघात केला आहे. तसेच ठाकरे यांची जास्त लांब जाण्याची मानसिकता नाही, ते जवळच सभा घेतात. ते गडचिरोलीला जाऊन सभा घेणार नाहीत. ते मातोश्रीपासून जवळ असणाऱ्या ठिकाणी सभा घेतात अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO

तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती

अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?

पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
