सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय शिरसाट यांनी व्यक्त केला मोठा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले...

सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय शिरसाट यांनी व्यक्त केला मोठा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले…

| Updated on: May 09, 2023 | 2:43 PM

VIDEO | संजय शिरसाट म्हणतात, संजय राऊत यांना हा रोग आहे, पाहा नेमका कोणता रोग असल्याचा केला दावा

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल येत्या दोन ते तीन दिवसात लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकार जाईल आणि महाराष्ट्रात बदल होईल, अशी चर्चां पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, ‘सत्तासंघर्षांचा निकाल लागेल पण तो आमच्याच बाजूने लागेल. आमच्या विरोधात नाही. काही लोकं वाट बघत आहेत मात्र तसं काही होणार नाही.’ तर सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहण्याचा रोग जडलाय. हा तीनपाटपणा कशाला पाहिजेत. असे सल्लागार होते म्हणूनच पक्षाच वाटोळं झालं, असे म्हणत राऊतांवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी तुटण्याचे आता संकेत आहेत. आघाडी टिकणार नाही. वज्रमूठ वैगेरे सर्व काही बकवास आहे. आघाडीत बिघाडी करण्याचं काम संजय राऊत करताय. त्यामुळे महाविकास आघाडी टिकणार नाही, काही झालं तर या तिन्ही पक्षांची युती होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

Published on: May 09, 2023 02:43 PM