शरद पवार एका पायावर महायुतीत यायला तयार… शिंदेच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा काय?
शरद पवार एका पायावर महायुतीत यायला तयार? शरद पवार यांच्या समंतीनेच अजित पवार शपथविधीला आले होते, अजित पवार यांनी दोन वेळा शपथ घेतली ती काय शरद पवार यांना न सांगता घेतली का? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा सवाल करत संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावाही केला आहे.
शरद पवार एका पायावर महायुतीत यायला तयार होते, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. एतकंच नाहीतर शरद पवार यांच्या समंतीनेच अजित पवार शपथविधीला आले होते, अजित पवार यांनी दोन वेळा शपथ घेतली ती काय शरद पवार यांना न सांगता घेतली का? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा सवाल करत संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावाही केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर शरद पवार स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपसोबत युती करतील, असंही मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पूर्णतः संपलेला आहे. उबाठामध्ये फाटाफूट झालेली आहे. काँग्रेसचं भवितव्य टिकवण्यासाठी, स्वतःचं अस्तिस्व टिकवण्यासाठी शरद पवारच भाजपसोबत युती करतील, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.