कीर्तिकरांच्या 'त्या' वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? संजय शिरसाटांनी स्पष्ट म्हटलं...

कीर्तिकरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? संजय शिरसाटांनी स्पष्ट म्हटलं…

| Updated on: May 23, 2024 | 4:14 PM

'माझ्या माहितीप्रमाणे गजानन कीर्तिकर यांनी उमेदवारी मागितली नव्हती. मुळात त्यांनी ही निवडणूक लढवावी असाच आमचा आग्रह होता. परंतू त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही.....', गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? शिरसाटांची प्रतिक्रिया

अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांना सवाल केला असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे गजानन कीर्तिकर यांनी उमेदवारी मागितली नव्हती. मुळात त्यांनी ही निवडणूक लढवावी असाच आमचा आग्रह होता. परंतू त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर केली. तरीही यामध्ये काही शंका असेल तर त्यासंदर्भात गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत होणाऱ्या चर्चेतून सारं काही निष्पन्न होईल, असे शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले. तर आज उद्या गजानन कीर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट होणार असल्याची माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली.

Published on: May 23, 2024 04:13 PM