Sanjay Shirsat : दसरा मेळाव्याच्या बॅनरवरून संजय राऊत यांची टीका, संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत काढली लायकी
VIDEO | दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आलीये. यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून संजय राऊत यांनी टीका केली होती. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आलीये. यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती. याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत फोटो लावण्यासाठी लायकी लागते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेला शिवसैनिक बाळासाहेबांच्या फोटोशिवाय जगू शकत नाही. म्हणून ती लायकी निर्माण करा, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार डोक्यात घाला असे म्हणत शिवसैनिक माझे कवचकुंडल आहेत, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आहोत. हे राऊतांना माहिती नाही. असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांना कांदा खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. उबाठा गटातील गॅग आहे त्यांना कांदेच हवेत. त्यामुळे कांदा स्वस्त झाला की महाग झाला यावर त्यांचं लक्ष आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय.