Sanjay Shirsat : निकालानंतर शरद पवारांसोबत एकनाथ शिंदे गेले तर…, संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, म्हणाले….
संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य साधं सुधं नाहीये. त्यामुळे सध्या शिरसाटांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होतेय. निकालापूर्वीच शरद पवारांसोबत जाण्यावरून संजय शिरसाट यांनी एक प्रकारे नकार न दिल्याने उलट-सुलट चर्चांना फोडणी बसली आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडीचं याचा निकाल उद्या लागणार आहे. पण निकालापूर्वीच शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. निकालानंतर शरद पवारांसोबत एकनाथ शिंदे गेले तरी शिंदेंचा निर्णय मान्य असेल असे संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य साधं सुधं नाहीये. त्यामुळे सध्या शिरसाटांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होतेय. निकालापूर्वीच शरद पवारांसोबत जाण्यावरून संजय शिरसाट यांनी एक प्रकारे नकार न दिल्याने उलट-सुलट चर्चांना फोडणी बसली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर काय? या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, एकनाथ शिंदे योग्य दिशेने जात असतात हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्या मागे आम्ही जाऊ. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. संजय शिरसाटांनी असं वक्तव्य करताच भाजपकडून प्रवीण दरेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेला तुम्ही शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे, असं म्हणत ते लक्षात आणून दिलं. तर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया अधिकृत नसेल हा ही दावा केलाय.