“राष्ट्रवादीत जास्त खदखद, जयंत पाटील आमदारांकडे लक्ष द्या”, शिवसेनेचा खोचक सल्ला
"निधी, सोयी-सवलतींसाठी काही जण तात्पुरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत. तसेच त्यांची घरवापसी होऊ शकते", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी लगावला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : “निधी, सोयी-सवलतींसाठी काही जण तात्पुरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत. तसेच त्यांची घरवापसी होऊ शकते”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी लगावला. तसेच “एका कार्यकर्त्याने मला तिथून निधी आणतो आणि परत येतो, असं सागितलं आहे”, हा किस्सा देखील जयंत पाटील यांनी सांगितला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील सध्या स्वत:च्या पक्षापेक्षा इतरांच्या पक्षामध्ये डोकावत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, राष्ट्रवादीत जास्त खदखद आहे, आमदारांमध्ये नाराजी आहे त्यावर लक्ष द्या, कारण त्याचे परिणाम दरवेळेला आपल्यासमोर येत असतो”, असं संजय शिरसाट म्हणाले.