हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
Sanjay Shirsat On Sanjay Raut : 'माणूस खरा शिवसैनिक आहे का? लोकप्रभामध्ये काम करणारा माणूस सामनामध्ये नोकरीला लागला. तिथे हुजरेगिरी करून कार्यकर्त्येच्या भूमिकेतून नेता झाला. त्याला काय माहिती शिवसेनेचं आंदोलन? कसं होतं शिवसेना भवन? त्यामुळे त्याने असली नकली शिवेसना करू नये, त्याची लायकी नाही'
बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावंतांच्या मदतीने शिवसेना पुढे नेली. तर बाळासाहेब ठाकरे यांनी बेईमानांशी संबंध ठेवला नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत हे शिवसैनिक आहे का? असा खोचक सवाल संजय शिरसाट यांनी केला. तर शिवसेना कशी होती हे संजय राऊत यांना काय माहिती? असली नकली असा फरत करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हणत राऊतांची थेट लायकीच काढली आहे. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले, ‘माणूस खरा शिवसैनिक आहे का? लोकप्रभामध्ये काम करणारा माणूस सामनामध्ये नोकरीला लागला. तिथे हुजरेगिरी करून कार्यकर्त्येच्या भूमिकेतून नेता झाला. त्याला काय माहिती शिवसेनेचं आंदोलन? कसं होतं शिवसेना भवन? त्या शिवसेना भवनात काय चालायचं? हे काही माहिती आहे का? त्यामुळे त्याने असली नकली शिवेसना करू नये, त्याची लायकी नाही’.