माफी मागितली नाही तर… शिंदेंच्या ‘त्या’ कायदेशीर नोटीसवर संजय शिरसाटांचा राऊतांना इशारा
तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरूनच संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट ?
लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अफाट पैशांचा वापर केला, असा मोठा दावा सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी केला होता. इतकंच नाहीतर प्रत्येक मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी किमान २५ ते ३० कोटी रूपये वाटले असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. तर तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरूनच संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. शिरसाट म्हणाले, कायद्याचा धाक नसलेली ही लोकं जी बेताल वक्तव्य करतात ती सामान्य लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे जनतेचा अशा राजकीय नेत्यांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय तर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना जाणीवपूर्वक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. जर या नोटीसीनंतर तीन दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागितली नाही तर पुढील कारवाईला संजय राऊतांना सामोरे जावं लागेल, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.