Video : स्कूलबस नॉटरिचेबल, पालक काळजीत

Video : स्कूलबस नॉटरिचेबल, पालक काळजीत

| Updated on: Apr 04, 2022 | 6:22 PM

मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील (Podar School in Santacruz) काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसनं (School Bus) निघाले. मात्र बराच वेळ घरी परतले नव्हते. स्कूल बसने हे विद्यार्थी (School Students) शाळा सुटल्यानंतर घरी परतं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्यानं पालकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर 12.30 वाजल्यापासून शाळेची स्कूलबस नॉट रिचेबल असल्यानं काळजी आणखीनंच वाढली होती. अस्वस्थ झालेल्या […]

मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील (Podar School in Santacruz) काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसनं (School Bus) निघाले. मात्र बराच वेळ घरी परतले नव्हते. स्कूल बसने हे विद्यार्थी (School Students) शाळा सुटल्यानंतर घरी परतं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्यानं पालकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर 12.30 वाजल्यापासून शाळेची स्कूलबस नॉट रिचेबल असल्यानं काळजी आणखीनंच वाढली होती. अस्वस्थ झालेल्या पालकांनी अखेर शाळा गाठली आणि जाब विचारला. संतापलेल्या पालकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पालकांच्याही संतापाचा पारा आणखीनंच वाढत गेला. अखेर ही मुलं आता घरी परतली असल्याची माहिती समोर आली आहे. सांताक्रूझ पोलिसही शाळेच्या आवारत ही घटना समजल्यानंतर दाखल झाले होते. मात्र मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पालकांनी अनेक सवालही उपस्थित केलेत.